सर्व आरत्या
श्री विठ्ठल

येई हो विठ्ठले

श्री विठ्ठलाची आरती · 7 कडवी
कडवे १
येई हो विठ्ठले माझे माऊलीये । येई हो विठ्ठले माझे माऊलीये ॥ निढळावरी कर... निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे । ओ, देवा वाट मी पाहे ॥
कडवे २
आलीया, गेलीया हाती धाडी निरोपं । आलीया, गेलीया हाती धाडी निरोपं ॥ पंढरपूरी आहे... पंढरपूरी आहे माझा माय-बाप । ओ, माझा माय-बाप ॥
कडवे ३
येई हो विठ्ठले माझे माऊलीये ॥
कडवे ४
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला । गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला ॥
कडवे ५
येई हो विठ्ठले माझे माऊलीये ॥
कडवे ६
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी । विष्णুদাস नामा जीवेभावे ओवाळी ॥
कडवे ७
येई हो विठ्ठले माझे माऊलीये ॥