सर्व आरत्या
युगे अठ्ठावीस
विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस · 6 कडवी
कडवे १
युगे अठ्ठावीस विटेवर उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।
कडवे २
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।।
कडवे ३
तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।।
कडवे ४
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।।
कडवे ५
धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।।
कडवे ६
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।।