‹
सर्व आरत्या
☀
A-
A+
✦
श्री शंकर
लवथवती विक्राळा
श्री शंकराची आरती · 8 कडवी
कडवे १
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळा ॥
कडवे २
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥
कडवे ३
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥
कडवे ४
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥
कडवे ५
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें । त्यामाजी अवचित हळाहळ उठलें ॥ तें त्वां असुरपणे प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥
कडवे ६
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥
कडवे ७
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥
कडवे ८
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
‹
मागील
सुखकर्ता दुखहर्ता
पुढील
›
दुर्गे दुर्घट भारी
दुसरी आरती म्हणा
सुखकर्ता दुखहर्ता
सुखकर्ता दुखहर्ता · 6 कडवी
▶
दुर्गे दुर्घट भारी
श्री देवीची आरती · 6 कडवी
›
येई हो विठ्ठले
श्री विठ्ठलाची आरती · 7 कडवी
›
घालीन लोटांगण
समाप्तीची प्रार्थना · 5 कडवी
›