कडवे १
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविति साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥
लोपलें ज्ञान जगीं ।
हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग ।
नाम ठेविले ज्ञानी ॥
कडवे २
कनकाचे ताट करीं ।
उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो ।
साम गायन करी ॥
कडवे ३
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविति साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥
कडवे ४
प्रकट गुह्य बोलें ।
विश्व ब्रह्माची केलें ।
रामजनार्दनीं ।
पायीं मस्तक ठेविले ॥
कडवे ५
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविति साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥