सर्व आरत्या
श्री दुर्गा

दुर्गे दुर्घट भारी

श्री देवीची आरती · 6 कडवी
कडवे १
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणातें वारी । हारी पडलो आतां संकट निवारी ॥
कडवे २
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
कडवे ३
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऐसी नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥ साही विवाद करितां पडले प्रवाहीं । तें तूं भक्तांलागी पावसि लवलाहीं ॥
कडवे ४
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
कडवे ५
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा ॥ अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥
कडवे ६
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥