सर्व आरत्या
आचमन पंचामृत स्नान
श्री गणेश

आचमन पंचामृत स्नान

गणेश स्थापना संपूर्ण विधी · 2 श्लोक
आचमन
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदित । शुद्धोदकेन तोयेन शीघ्रमाचमनं कुरु ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ॥ ( पळीभर पाणी ताम्हनात सोडावे )
पंचामृत स्नान
पंचामृत एकत्र करून किंवा दूध, दही, तुप, मध, साखर या क्रमाने निरनिराळी अर्पण करावी. एकत्र केलेली असल्यास म्हणावे- पयो दधि घृतं चैव मधुशर्करया युतम् । पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वर ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । पंचामृतस्नानं समर्पयामि ॥ पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि । ( दूध, दही, तूप, मध व साखर वाहणे. मध्ये शुद्धोदक देणे )