प्राणप्रतिष्ठा
पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्ति: क्रों कीलकम् ।
अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् ।
देवस्य प्राणा इह प्राणा: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् ।
देवस्य जीव इह स्थित: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् ।
देवस्य सर्वेन्द्रियाणि ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् ।
देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्त आहेत. वेदोक्त मंत्रपठण न शिकलेल्यांनी पुढील श्लोक म्हणावा.
अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर ‘ॐ’ किंवा ‘परमात्मने नमः ।’
असे १५ वेळा म्हणावे.
ध्यान
हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.
ॐ गणानांत्वागणपतिंहवामहे-
कविंकवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजंब्रह्मणांब्रह्मणस्पत-आनःशृण्वन्नूतिभिःसीदसादनम् ।।
हा मंत्र वेदोक्त आहे. वेदोक्त मंत्रपठण न शिकलेल्यांनी पुढील श्लोक म्हणावा.एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।।
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत आणि हातांमध्ये अंकुश अन् पाश धारण केला आहे, अशा श्री सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१. आवाहन
उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा.
(अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.
२. आसन
उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् ।
स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।
३. पाद्य
उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
सर्वतीर्थसमुद्भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् ।
विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्तवत्सल ।।
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
पाद्यं समर्पयामि ।।
४. अर्घ्य
डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
अर्घ्यं च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।
गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।।
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
अर्घ्यं समर्पयामि ।।
५. आचमन
डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् ।
गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे गणाध्यक्षा (गणनायका), तुला नमस्कार असो. हे करुणेच्या सागरा, गंध, फुले, अक्षता आणि फळे यांच्यासह असणार्या या अर्घ्याचा स्वीकार कर.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
अर्घ्यं समर्पयामि ॥
६. स्नान
पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: ।
स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।।
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे.
हे देवा, मला शांती प्रदान कर.।
६ अ. पंचामृतस्नान
देवतेला दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालण्यासाठी उजव्या हातात २ दूर्वा घ्याव्यात. नंतर पुढीलप्रमाणे ‘समर्पयामि’ म्हणतांना श्री सिद्धिविनायकाच्या चरणांवर दूध आणि नंतर पंचपात्रातील शुद्ध पाणी प्रोक्षण करावे. अशाच प्रकारे अनुक्रमे उर्वरित प्रत्येक उपचाराद्वारे देवाला स्नान घालावे.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पयस्नानं समर्पयामि ।
दूर्वांच्या साहाय्याने पुढील प्रत्येक उपचाराद्वारे स्नान घातल्यानंतर ‘तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥’ असे म्हणत ‘श्री सिद्धिविनायकाच्या चरणी शुद्ध पाणी प्रोक्षण करावे.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
दधिस्नानं समर्पयामि ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
घृतस्नानं समर्पयामि ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
मधुस्नानं समर्पयामि ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
शर्करास्नानं समर्पयामि ॥
६ आ. गंधोदकस्नान
पाण्यात गंध अन् कापूर घालून ते पाणी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
गन्धोदकस्नानं समर्पयामि ॥
तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥
७. वस्त्र
कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि’ म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा.
रक्तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् ।
सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर.
उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।
८. यज्ञोपवीत
श्री सिद्धिविनायकाला यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करावे किंवा अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्योत्तरीयकम् ।
विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपविताचा तू स्वीकार कर.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
यज्ञोपवीतं / यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
यज्ञोपवीत हे श्री गणेशाच्या गळ्यात घालावे आणि नंतर ते मूर्तीच्या उजव्या हाताखाली घ्यावे.
९. चंदन
श्री सिद्धिविनायकाला अनामिकेने गंध लावावे.
श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ।
विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
ऋद्धिसिद्धिभ्यां नमः ।
हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ॥
(मूर्तीच्या चरणी हळद-कुंकू वहावे.)
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
सिन्दूरं समर्पयामि ॥
(श्री सिद्धिविनायकाच्या चरणी शेंदूर वहावा.)
१०. फुले-पत्री
उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावीत.
माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो ।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ।।
सेवन्तिकाबकुलम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः ।
बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ।।
अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले यांचा आपण स्वीकार करावा. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, गुलाब, कमळ, नागचाफा, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, प्रवाळ, तुळस, चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्वरा, तू प्रसन्न हो.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।
अंगपूजा
पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने (मध्यमा, अनामिका [करंगळीच्या शेजाचरचे बोट] आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नमः । पादौ पूजयामि ।। (चरणांवर)
श्री विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर)
श्री आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर)
श्री हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि ।। (कमरेवर)
श्री कामारिसूनवे नमः । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर)
श्री लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि ।। (पोटावर)
श्री गौरीसुताय नमः । हृदयं पूजयामि ।। (छातीवर)
श्री स्थूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयामि ।। (गळ्यावर)
श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि ।। (खांद्यांवर)
श्री पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नमः । नेत्रे पूजयामि ।। (डोळ्यांवर)
श्री सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि ।। (मस्तकावर)
श्री गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा
पुढील नावांनी देठ देवाकडे करून ‘समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. (सर्व ठिकाणी प्रत्येक प्रकारची पत्री उपलब्ध असेलच, असे नाही. त्यामुळे जी पत्री उपलब्ध झाली नसेल, त्या पत्रीच्या ठिकाणी देवाला २ दूर्वा किंवा अक्षता वहाव्यात.)
श्री सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान)
श्री गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ।। (माका)
श्री उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल)
श्री गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्या दूर्वा)
श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा)
श्री गजकर्णाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस)
श्री गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा)
श्री वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी)
श्री एकदन्ताय नमः । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा)
श्री विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर)
श्री विनायकाय नमः । अश्मन्तकपत्रं समर्पयामि ।। (आपटा)
श्री कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई)
श्री भिन्नदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा)
श्री पत्नीयुताय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण)
श्री बटवेनमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब)
श्री सुरेशाय नमः । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार)
श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्रं समर्पयामि ।।(मरवा)
श्री हेरम्बाय नमः । सिन्दुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड)
श्री शूर्पकर्णाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई)
श्री सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ किंवा १ सहस्र नावे उच्चारून एकेक दूर्वा अर्पण करतात.
११. धूप
धूप दाखवावा किंवा उदबत्ती ओवाळावी.
वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।
आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला आणि सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
धूपं समर्पयामि ।।
१२. दीप
निरांजन ओवाळावे.
आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्या देवेशा, मी अग्नीने संयुक्त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, भक्तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
दीपं समर्पयामि ।।
(निरांजन ओवाळावे.)
१३. नैवेद्य
उजव्या हातात २ दूर्वा (दूर्वा नसल्यास शमी किंवा बेलाचे पान चालेल.) घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून दूर्वा हातातच धराव्यात. दूर्वांसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी श्री सिद्धिविनायकाला त्या नैवेद्याचा गंध देतांना (नैवेद्य समर्पित करतांना) पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती अचल करावी. या लोकात माझे अभीष्ट आणि ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ; दही, दूध, तूप आदी भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नमः ।
अपानाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः । समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।।
पूजकाने हातातील १ दूर्वा नैवेद्यावर ठेवावी आणि दुसरी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहावी. डाव्या हातातील पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्रातील ‘समर्पयामि’ असे म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.
नैवेद्यं समर्पयामि ।
मध्ये पानीयं समर्पयामि ।
उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।
फुलाला गंध लावून ते फूल देवाला वहावे.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
१४. नमस्कार
नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत: ।।
नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्या, शाश्वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
नमस्कारान् समर्पयामि ।।
१५. प्रदक्षिणा
नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावेत आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःच्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
प्रदक्षिणां समर्पयामि ।।
दूर्वायुग्मसमर्पण
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावाने दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नमः ।
दूर्वायुग्मं समर्पयामि ।।
याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर ‘दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.
श्री गणाधिपाय नमः ।
श्री उमापुत्राय नमः ।
श्री अघनाशनाय नमः ।
श्री एकदन्ताय नमः ।
श्री इभवक्त्राय नमः ।
श्री मूषकवाहनाय नमः ।
श्री विनायकाय नमः ।
श्री ईशपुत्राय नमः ।
श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ।
श्री कुमारगुरवे नमः ।।
नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
दूर्वामेकां समर्पयामि ।।
१६. मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना
देवाला अर्पण करण्यासाठी फुले हातांच्या ओंजळीत घ्यावीत आणि पुढील श्लोक म्हणून ती देवाच्या चरणी अर्पण करावीत.
मालतीमल्लिकाजातीपद्ममन्दारचम्पकैः ।
भक्त्यार्पितं मया देव गृहाण कुसुमाञ्जलिम् ।।
अर्थ : हे देवा, मी चमेली, मोगरा, जाई, कमळ, मंदार आणि चाफा यांची भक्तीने अर्पण केलेली पुष्पांजली स्वीकार.
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।
तर पुढील प्रार्थना करावी.
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।
अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. जी काही मी तुझी पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडत असतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धी आदींद्वारे काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.
अनेन देशकालाद्यनुसारतः कृतपूजनेन ।
श्री सिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।।
(हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
प्रीतो भवतु ।
तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
अर्थ : अशा प्रकारे मी देशकालास अनुसरून केलेल्या पूजेने श्री सिद्धिविनायक संतुष्ट होऊ दे. देव माझ्यावर प्रसन्न होऊ दे. हे सर्व मी कर्म ब्रह्माला अर्पण करतो.
जयघोष
देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
पूजेच्या शेवटी व्यक्त करावयाची कृतज्ञता
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या कृपेने माझ्याकडून भावपूर्ण पूजा झाली. तुझ्या कृपेने पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहिले. पूजेतील चैतन्याचा मला लाभ झाला. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
या वेळी डोळे मिटून ‘मूर्तीतील चैतन्य आपल्या हृदयात येत आहे’, असा भाव ठेवावा.
प्रसादग्रहण
प्रसाद भावपूर्णपणे ग्रहण करावा.
मोदक वायनदान
एका केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये २१ मोदक ठेवावेत. त्यातील एका मोदकाचा नैवेद्य श्री सिद्धिविनायकाला दाखवावा. (पूजेमध्ये यापूर्वी नैवेद्य दाखवण्याची कृती दिली आहे.) उर्वरित मोदकांपैकी १० मोदक केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये घेऊन त्यावर दुसरे केळीचे पान किंवा ताट उपडे ठेवावे. त्यावर गंध-फूल वहावे. नंतर पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला १० मोदकांचे वायनदान द्यावे.)
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
अर्थ : मोदक प्रिय असणार्या हे विनायका, तुला सतत नमस्कार असो. तू सर्वदा माझ्या सर्व कार्यांतील विघ्ने दूर कर. मी तुझ्या संतुष्टीसाठी ब्राह्मणाला दक्षिणेसह १० मोदकांचे ‘वायनदान’ (व्रताच्या सांगतेनिमित्त दिलेले ‘दान’) देत आहे.
नंतर उर्वरित १० मोदक यजमानासह कुटुंबियांनी ‘देवाचा प्रसाद’ म्हणून ग्रहण करावेत. मग दोन वेळा आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.