हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे
कुंकूमतिलक
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा
आचमन
उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि श्रीविष्णूच्या प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे –
१. श्री केशवाय नम: ।
२. श्री नारायणाय नम: ।
३. श्री माधवाय नम: ।
चौथे नाव उच्चारतांना `नम:’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविंदाय नम: ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नम: ।
६. श्री मधुसूदनाय नम: ।
७. श्री त्रिविक्रमाय नम: ।
८. श्री वामनाय नम: ।
९. श्री श्रीधराय नम: ।
१०. श्री हृषीकेशाय नम: ।
११. श्री पद्मनाभाय नम: ।
१२. श्री दामोदराय नम: ।
१३. श्री संकर्षणाय नम: ।
१४. श्री वासुदेवाय नम: ।
१५. श्री प्रद्मुम्नाय नम: ।
१६. श्री अनिरुद्धाय नम: ।
१७. श्री पुरुषोत्तमाय नम: ।
१८. श्री अधोक्षजाय नम: ।
१९. श्री नारसिंहाय नम: ।
२०. श्री अच्युताय नम: ।
२१. श्री जनार्दनाय नम: ।
२२. श्री उपेंद्राय नम: ।
२३. श्री हरये नम: ।
२४. श्री श्रीकृष्णाय नम: ।।
पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत.
नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत
पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील ‘देशकाल’ म्हणावा)
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.
ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा.
`तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।।
संकल्प
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘संकल्प’ उच्चारावा.
मम आत्मनः परमेश्वराज्ञारूपसकलशास्त्र-श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम श्रीसिद्धिविनायकप्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं सर्वकर्मनिर्विघ्नत्वपुत्रपौत्राभिवृद्धि महैश्वर्यविद्याविजयसंपदादिकल्पोक्त-फलसिद्ध्यर्थम् श्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थं ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजनमहं करिष्ये ।
तत्रादौ निर्विघ्नतासिध्द्यर्थं श्री महागणपतिपूजनं करिष्ये ।
शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणं करिष्ये ।
कलशशङ्खघण्टादीपपूजनं च करिष्ये ।।