प्रारंभी विनति करु गणपती विद्यादयासागरा ।
अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥ १॥
कडवे 2
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥ २॥