सर्व आरत्या
सुखकर्ता दुखहर्ता
श्री गणेश

सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता · 6 कडवी
कडवे १
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥
कडवे २
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥
कडवे ३
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥
कडवे ४
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
कडवे ५
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥
कडवे ६
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥