सर्व आरत्या
श्रीगणपतीची उत्तरपूजा
श्री गणेश

श्रीगणपतीची उत्तरपूजा

उत्तरपूजा विधी · 2 श्लोक
श्रीगणपतीची उत्तरपूजा
आचम्य श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि । वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध , फुले , अक्षता , हळद , कुंकू , दूर्वा , शेंदूर हे उपचार वाहावेत .
श्रीगणपतीची उत्तरपूजा
श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि । वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप , दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा . कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत आरती , मंत्रपुष्प व प्रार्थना करुन झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी. अनेन कृत उत्तराराधनेन तेन श्रीभगवान् सिद्धिविनायकः सांगः सपरिवारः प्रियताम् । ॐ तत्सत् ॥ एवढया वरील सर्व गोष्टी करुन झाल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा व नंतर खाली दिलेला मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थं पुनरागमनाय च ॥ ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ॥